ORIGAMI
('Ori' in Japanese is 'folding' and 'Kami' is 'paper' ='Origami' is the art of folding paper)
सप्टेंबर २०१२ ची दुपार! आदित्य आणि मी Futako Tamagawa च्या स्टेशन वर ट्रेन ची वाट पाहत उभे होतो.
आदित्य च्या टेनिस क्लास चा आज पहिला दिवस आणि जपान मध्ये स्वतःहून प्रवास करण्याचा हि
पहिला दिवस. आदित्य ला आठवड्यातून तीन वेळा Futako Tamagawa ते Yamate हा ट्रेन प्रवास करावा लागणार होता.
Futako Tamagawa हे टोकियो मधील एक टुमदार suburb. छोटी छोटी भातुकलीची जपानी घर स्वच्छ, नीट नेटके आणि वळणदार रस्ते आणि ह्या सुंदर गावाला आपले ओळख देणारी तामा नदी. ट्रेन स्टेशन हि अगदी तसेच टुमदार.
ह्या स्टेशन वरून दोन शहरांना गाड्या जातात, एक line Tokyo ला आणि दुसरी Yokohama ला.
४ वाजल्याचा सुमार असल्याने स्टेशन वर शाळेची मुले आणि कामाला जा ये करणाऱ्या माणसांची वर्दळ होती.
निळा ब्लेझर, पांढरा शर्ट आणि निळा प्लेटेड स्कर्ट किंवा निळा शॉर्ट्स मधील मिचक्या डोळ्यांची कितीतरी जपानी मुले ट्रेन साठी उभी होती. एकमेकांच्या चेष्टा मस्करी करीत हसत खेळत गाडीची वाट पाहत होती. जपानी मुलांची मस्तीही शिस्तबद्ध असते.
आणि जपानी शिस्तीत अगदी घड्याळाच्या टोल्याला गाडी प्लॅटफॉर्म ला लागली. गर्दी असूनंही सगळी माणसे शिस्तीत गाडीत शिरली. प्रवास मोठा होता. माझ्या सवयी प्रमाणे मी आजू बाजूच्या लोक्कांचे निरीक्षण करू लागले.
काही लगेचच झोपी गेले, बरेचसे जण फोनवर गेम खेळू लागले, काही वयस्कर प्रवासी नीट नेटक्या खाकी कव्हर मध्ये लपलेली पुस्तके वाचू लागले. थोड्या वेळाने माझे लक्ष शाळेच्या चमू कडे गेले. त्यांची बसक्या आवाजातील बडबड आणि हास्य परत चालू झाले होते. त्यांची ती निरागस दुनिया पाहून मला माझे लहानपण , शाळेचा प्रवास आणि बेफिकीर हसणे आठवले. खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळूक ने परत मी त्या मुलांकडे पाहू लागले.
शाळा सुटल्यामुळे त्यातील प्रत्येक जण काही तरी खाऊ खात होता. माझी नजर एका चिमुरडीवर खिळली. आपल्या सवंगड्यांशी बोलताना हळूच तिने एक छोटीशी chocolate तिच्या खिशातून बाहेर काढली. रीतसर पणे तिने त्याचे wrapper उघडले चॉकेलतं तोंडात घातली.
म्हणायला हि किती छोटीशी आणि universal क्रिया आहे. तुम्ही मी आपण सगळेच chocolate खाताना हेच करतो. पण त्यापुढे त्या ५/६ वर्ष्यांच्या चिमुकलीने मला तिचे वेगेळेपण दाखवून दिले. Chocolate तोंडात चघळत चघळत , मित्रांशी बोलता बोलता तिने त्या wrapper च्या घड्या घालायला सुरुवात केली. अजिबात खाली न बघता तिचे हात तो कागद दुमडत होते. अगदी टोकाला टोक जोडल जाईल अस. मी अजूनच तिच्या हातांकडे बारकाईने पाहू लागले. एक, दोन , तीन , चार, आणि पाच घड्या! पाचवी घडी घातल्यावर त्या कागदाचा एक छोटासा चौकोन झाला.
तिच्या प्रत्येक घडी नंतर मी तिच्यात हरवून गेले होते. जसे तिचे हात थांबले तशी माझी उत्सुकता वाढली. दोन तीन क्षण मी विचार करत होते कि आता ही बाहुली काय करणार आहे .
तिने तो छोटासा चौकोन जेवढ्या प्रेमाने chocolate बाहेर काढले होते तेव्हढ्याच प्रेमाने आणि मानाने आपल्या खिशात ठेवला.
काही वेळाने ती मुले त्यांच्या स्टेशन वर उतरली. ती गोरीपान छोट्याश्या डोळ्यांची जपानी बाहुली माझी गुरु झाली होती. जपानी माणसे निसर्गावर प्रेम करतात ,त्याला मान देतात आणि ह्या गोष्टी त्यांच्या इतक्या अंगवळणी असतात कि जन्मताच मुलांना त्याचे बाळकडू पाजले जाते.
त्या छोट्याशा जपानी बाहुलीच्या chocolate खाण्याच्या प्रक्रियेत ,तिच्या डोळ्यात आणि हावभावात त्या वस्तू विषयी प्रेम , कृतन्यता आणि मान ओथंबून वाहत होता.
ही माझी पिटुकली गुरु नेहेमीच माझ्या बरोबर असते. कचऱ्यातही सौंदर्य असतं आणि त्याचा ही मान राखला पाहिजे हे ती मला सहज शिकवून गेली.
Chocolate खाण्याची इच्छा आणि कृती नंतरची जबाबदारी तिने खूप छान झेलली.
जपानची शिस्त,निसर्ग प्रेम,आईवडिलांबद्दल आदर आणि प्रेम,देशप्रेम.. पण ह्या ऐकीव गोष्टी..तो समोरच पाहिलेस म्हणून जास्त इम्पॅक्ट झाला न!! आता आपल्याकडेही ही सुरुवात झाली आहे.��
ReplyDeleteतुझी लेखनशैली छान आहे.पुढे काय लिहिले आहेस ते वाचावेसे वाटते. खरच लिहिती रहा
Thank you very much. These warm wishes mean a lot . I consider myself fortunate as Tokyo was and is my "home". I was blessed to live in this beautiful country, know it and its people and their culture very closely.
ReplyDeleteI am happy that you enjoyed the story.
"कचऱ्यातही सौंदर्य असतं आणि त्याचा ही मान राखला पाहिजे" Kiti sunder message.
ReplyDeleteNever been to Japan, but I really respect Japanese people for their discipline which comes to them naturally.
Hope one-day I can say this about India ........ "Swachh Bharat Abhiyan" will go beyond the politics
I am sure very soon it will be true to India too. I feel its our ,citizens' responsibility much more than the politicians.
ReplyDeleteThank you very much.
स्वाती, खूपच छान लिहिलं आहेस.
ReplyDeleteआपल्याकडे पण सगळे अस निसर्गावर प्रेम करायला लागतील अशी आशा ठेयुया.
Thank you Sonal
Delete