"Sumimasen Swati san! Here for you." हातात ४ छोटेसे shot glasses घेऊन आलेली Sachi san म्हणाली.
मी हसले ; ती हसली. "What is this, Sachi san ?"
"Chocolate mousse .... I made ...for you ....for my best friend ." ती म्हणाली. आणि हसत मुखाने ती परतली.
ते Chocolate mousse तोंडात विरघळतं होतं. मी चाटून पुसून तो glass संपवून टाकला. आणि ताबडतोब धावत दुसऱ्या मजल्यावर बेडरूम च्या गच्चीत गेले. "Sachi san .......Sachi San .......Saya chan..... Saya chan ......." त्या हाक्कानसरशी रस्त्या पलीकडच्या घरातील खिडकीत छोटासा गुलाबी, गोल गरगरीत चेहेरा पडद्या आडून डोकावू लागला.
त्या २ वर्ष्यांच्या जपानी बाहुलीला मी तिच्या आई ला बोलवायला सांगितले. दुडू दुडू धावत तिने आईला निरोप पोचता केला.
"Domo arigato gozaimasu. Chocolate mousse ga oiishi desu."माझ्या थोड्याश्या Japanese मध्ये मी तिला धन्यवाद दिले. तिच्या बाजूला जागा करून Saya chan तिच्या सारख्याच बारीक डोळ्यांच्या, गुलाबी अंगाच्या Japanese बाहुल्या मला दाखवू लागली.
Sachi san आणि मी Komazawa ह्या Tokyo च्या एका छोटाश्या suburb मधल्या शेजारीणी ,अगदी सक्ख्या शेजारीणी ! आमची ओळख कशी झाली ह्या बद्दल पूर्ण write up लागेल.
माझ्या अखंड बडबडीने मी तिची आणि तिच्या छोट्याश्या बाहुलीची सहज मैत्रीण झाले. मी Sachi san ची एकुलती एक आणि पहिली आणि किंबहुना शेवटची non Japanese मैत्रीण. ती आमची मैत्री जीवापाड जपते.
Saya chan ला एक पिटुकली बहीण झाल्याने Chocolate mousse ने पेढ्यांचे काम केले होते.
Chocolate mousse खाऊन खूप दिवस झाले होते तरी त्याची ती perfect चव माझ्या जिभेवर रेंगाळत होती. Japanese desserts परफेक्ट गोड असतात; जास्त गोड नाहीत की अगोड नाहीत..... Just Perfect for your palate. आणि म्हणूनच ती परत परत खावीशी वाटतात.
त्याचं दरम्यान आमच्या कडे मुंबईहून एक मित्र येणार होता. जेवणाचा मेनू ठरवताना मला ते chocolate mousse आठवले. मी परत एकदा Sachi san ला त्याची आठवण करून देत रेसिपी मागितली. तिला म्हटले की माझ्या मित्राला छानसं Japanese dessert देऊन surprise करायचे आहे.
नेहेमीच्याचं स्मित हास्याने तिने विनंती स्वीकारली.
Japanese लोकं दिलेला शब्द आणि वेळ काहीही झाले तरी पाळतात. Japanese take pride in that. त्यामुळे मला रेसिपी लवकरच मिळणार ह्याची खात्री होती.
४ दिवस रेसिपीची वाट पाहण्यात निघून गेले. Sachi San ला परत आठवण करून द्यावी का? असा विचार मनात येऊन गेला. पण तो पर्यंत जे काही जपानी culture बद्दल कळलं होते त्या नुसार 'आठवण ' करून देणे म्हणजे त्यांना दुखावण्या सारखे होते.
मैत्री आणि Chocolate mousse मध्ये ,मी मैत्री निवडली.
पाचव्या दिवशी सकाळ पासूनच धो धो पाऊस कोसळत होता. संध्याकाळी 5 च्या सुमारास आमचा मुंबईचा पाहुणा घरी आला.
मी ठरवलेल्या मेनू प्रमाणे जेवण केले होते. का कोण जाणे पण माझा जीव त्या Chocolate mousse मध्येचं एवढा अडकला होता की जेवल्या नंतर Ice Cream देण्याचे ठरविले.
पाऊसामुळे सर्वत्र काळोख झाला होता. रस्तावरचे दिवे ही मंद वाटत होते. महेश अजून घरी आला नव्हता. मित्राशी बोलताना माझे कान महेशच्या गाडीच्या आवाजाकडे लागले होते. आणि Door bell वाजली.
"अरे ! महेश आला. आज गाडी park केल्याचा आवाज आलाच नाही. " असा म्हणत मी आमच्या घराच्या तळ मजल्यावरच दारं उघडले. जरा चपापलेंच ..... पावसाने थैमान घातले होते. झाडं सुसाट वाऱ्याशी झुंजत होती.
आणि अश्यात Sachi San उभी होती. हातातली छत्री उडून जाऊ नये म्हणून तिने मानेशी घट्ट पकडली होती. तिचा गोरा पान चेहेरा संपूर्ण भिजला होता. एका हाताशी आपल्या बाहुलीला घट्ट मिठीत घेऊन इवलीशी छत्री सांभाळत Saya Chan हसत उभी होती. गळ्यात ओजंळी बांधून त्यात २ आठवड्यांची नाजूक, पिटुकली Nana chan मुटकुळं करून झोपली होती.
काही क्षण मला काहीच कळेना. काहीही झाले तरी आगाऊ सूचना देऊन येणारी Sachi San एवढ्या पावसात छोट्याश्या बाळांना घेऊन का बरं आली असेल?! उगाच नको नको ते विचार मनात येऊन गेले.
"Swati san... Swati san... " तिच्या हाकेने मी शुद्धीत आले. तिला म्हटले पटकन आत ये. पण ती घाईत होती. तिने पटकन एक मोठा डबा माझ्या हातात दिला.
"Swati San , This is Chocolate Mousse for you and your friend from India." मी तिच्या कडे तोंड आ वासून पाहाताच राहिले. "Sachi San , Why did you come in this heavy rain? You and your babies are getting wet."
पण ती आणि मी वेगळ्या विश्वात होतो. ती पटकन म्हणाली, " Swati San is my friend. You wanted the recipe but my baby was not well. So I didn't have time to write it down and give it to you in time. I remember you telling me that your friend will come today. So I quickly prepared it."
Sachi san पावसात भिजत होती पण माझे मन तिच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दाने चिंब भिजत होते. मी अस्पष्ट पणे पुटपुटले ,"Why did you make this when your baby is not well ?"
त्यानंतर जे काही मी ऐकलें , मला कळले; ते बहुदा श्री कृष्णाने अर्जुनाला दाखविलेले ब्रम्हांड रूप असावे.
"Swati San , You wanted to give Japanese dessert to your Indian friend. If you don't give this dessert to him then "my friend" will feel ashamed not to keep the promise. So I prepared this for the respect and pride of my best friend. Please do not tell your Indian guest that I prepared this. Please tell that you prepared this.
Your respect is my respect because you are very important friend to me."
तिच्या अपुऱ्या, मोडक्या English शब्दानं मधून तिच्या भावना माझ्या हृदय पर्यंत पोचल्या होत्या. माझ्या हातात डबा देऊन ती हसतच पाठमोरी वळली आणि पाऊसात दिशेनाशी झाली.
श्री कृष्णा ने आपले रूप आटोपते घेतले होते.
मला काहीच सुचत नव्हते. मी दार बंद केले आणि तिथेच मटकन खाली बसले. माझ्या पायात त्राण राहिले नव्हते.
काय घडले होते?
मी काय ऐकले?
ती Japanese , मी Indian.
आमच्या भाषा मोडक्या होत्या.
माझी ....आमची ओळख काही महिन्यांची .. हसणे आणि विचारपूस सोडून मी तिच्या साठी काहीही मोठ केले नव्हते..... आणि तिचे शब्दं ,भावना परत मला ऐकू यायला लागल्या....
"तुझा मान तो माझा मान . माझ्या मैत्रिणीची मान पाहुण्या समोर झुकता कामा नये."
मी त्या बंद दाराच्या पायरीशी माझे डोके ठेवले. आणि माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले....
हातातले Chocolate Mousse 'खारट ' झाले!!!!
आणि कानावर कुमार गंधर्वांचे शब्द पडू लागले ......
"ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी
भेटींत तृष्टता मोठी
त्या कातरवेळा थरथरती कधी अधरी
भेटींत तृष्टता मोठी
त्या कातरवेळा थरथरती कधी अधरी
त्या तिन्हीसांजा, त्या आठवणी, त्या प्रहरी
कितिदा आलो, गेलो, जमलो
रुसण्यावाचुनी परस्परांच्या कधीं न घडल्या गोष्टी
भेटींत तृष्टता मोठी
हसण्यांवरती रुसण्यांसाठी
जन्मजन्मीच्या गाठी
भेटींत तृष्टता मोठी…"
भेटींत तृष्टता मोठी…"
मला त्या दिवशी "देव"Japanese रूपात दिसला !!!!!