२५ June,२००५ ला महेश आणि माझ्या आयुष्यातील phase २ चालू झाली .
महेशला ऑफिस कडून नवीन profile मिळाला आणि त्या निम्मिताने आम्ही ४/५ वर्ष्यांच्या छोट्याश्या आदित्यला घेऊन Singapore ला निघालो. आदी आणि माझा पहिला वाहिला international प्रवास आणि तोही थेट लांबलचक मुक्कामासाठी !
Routine settlement procedure नंतर आम्ही Changi Rise नावाच्या एका आलिशान condomenium मध्ये राहावयास गेलो. खूप छान condo होता तो; निळा swimming pool , पोहताना पाण्याखाली गेल्यावर ऐकू येणारे soothing music , मुलांना खेळाण्यासाठी sand pits , club house , लायब्ररी, जिम आणि बरेच काही. थोड्या दिवसांनी नव्याची नवलाई संपून आमचे आयुष्य एका रहाट गाडग्यात चालू झाले. महेशचे ऑफिस , आदीची शाळा आणि माझे घर सुरळीत व्हायला लागले.
घर लागल्यावर माझ्या नवीन नवीन ओळखी व्हायला लागल्या. माझी एका भारतीय जोडप्याशी ओळख झाली. येता जाता smile आणि hello exchange होऊ लागले. मी खुश होते कि परदेशात मला ओळखीचे वाटत होते.
७/८ महिन्यात आदित्यचा वाढदिवस आला. त्याच्या नवीन मित्रांना एकत्र आणण्यासाठी आम्ही आदीचा birthday club house मध्ये करण्याचे ठरवले. त्यांच्या नियमाप्रमाणे मी एका ठराविक रक्कमेचा cheque deposit म्हणून दिला. Party संपल्यावर तो cheque मला परत मिळणार होता.
पार्टी खूप छान झाली. पाहुणे मंडळी एकदम खुश आणि आम्ही ही खूप खुश झालो .
त्यानंतर काही आठवड्यांनी मी तो cheque परत घेण्यासाठी ऑफिसमध्ये गेले. Singapore ला बहुतेक वेळा मलय समाज्याची लोक administration ची काम करतात. त्या ऑफिस मध्ये ही एक मलय स्त्री होती. मी माझे details दिल्यावर ती माझा cheque शोधू लागली. तिला तो काही केल्या मिळेना. तिने मला १/२ दिवसांनंतर येण्याची विनंती केली.
२ दिवसांनी परत तो शोध चालू झाला. ५० वेळा परत परत माझे नाव आणि house नंबर विचारून झाल्या वर ती Singaporean ठेक्यात म्हणाली ," Oh la ! Your husband has already collected the cheque."
महेशला ह्या बद्दल काहीच कल्पना नव्हती.
थोडक्यात माझा cheque गायब! माझ्या मधील झाशीची राणी जागी झाली आणि मी त्या बाईंवर हल्ला चढवला .
परत शोध चालू झाला. मी तर सत्याग्रह करण्याच्या हेतूने घरातील सगळी कामे आटोपून तिथेच ठाण मांडून बसले.
एक तासाभरात "बाईंना " अचानक साक्षात्कार झाला कि cheque घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि माझ्या नवऱ्याचे नाव वेगळे आहे.
आता नवीन शोध ; cheque चा आणि त्या माणसाचा !
माझ्यातला James bond जागा झाला आणि खूप डोके फोड केल्या नंतर शेवटी "तो" माणूस सापडला.
"तो" होता मी ओळखत असलेल्या जोडप्यातील "तो"!
आम्ही दोन्ही कुटुंब भारतीय असल्यामुळे ऑफिस मधील "बाईंनी "काढलेला short cut !
शोध संपल्यावर डोकं थोड्या वेळ शांत झाले पण दहाव्या मिनिटाला परत उद्वेग आला.
“त्याने" माझाच Cheque वापरून २/३ समारंभ करून घेतले होते आणि त्यावर cheque ही घेऊन गेला होता.
त्या "बाईंनी" अजाणतेपणी चूक केली होती, पण "ह्या" गृहस्थाने जाऊन बुजून फायदा घेतला होता.
माझी स्वारी तडक त्याच्या दारावर चालून गेली. स्प्ष्ट बोलणी झाल्या वर त्याने हसत मुखाने जणू काही झालेच नाही अश्या अविर्भावात cheque परत केला.
ह्या सगळ्या प्रसंग मुळे मी खूप चिडले होते. संताप असह्य झाला होता.
लहानपणापासून माझा सावरकर आणि टिळकांकडे जास्त कल असल्याने माझ्यातील क्रांतिकारी मला गप्पा बसू देत नव्हता, पण मी काही करू ही शकत नव्हते.
मला शांत करण्या साठी माझे मीच ठरून टाकले " ह्या पुढे नवीन लोकांशी जास्त जवळीक करायचीच नाही. "
आणि परत नवीन दिवस आला.
माझा चेहेरा ठाम ठेवूनच मी आदित्यला स्कूल बस स्टॉप वर घेऊन बस ची वाट पाहत होते.
तिथे नेहेमीची ३/४ माणसे आपापल्या मुलांना घेऊन उभी होती. डोळ्याला डोळे भिडताच मी फक्त एक तुटक हास्य देत होते .आणि परत परत उजळणी करत होते," मी बरोबर, नव्हे बरोबर च आहे." आणि तेव्ह्याढ्यात मला एक आवाज ऐकू आला," Excuse me. School bus यही पे आयेगी ना?"
का कोण जाणे पण माझी उजळणी मला ऐकू येईनाशी झाली. माझे मन त्या प्रश्नाचे उत्तर देऊ बघत होते.
पण अजिबात नाही. माझी प्रतिज्ञा मोडणे शक्य नाही. माझे मन मला भुलवित आहे.
असे सगळे विचार परत दाटून आले आणि त्या अतिशय warm आवाजाला मी अतिशय तुटक पणे उत्तर दिले. बस गेल्यावर कोणाशीही न बोलता मान खाली घालून मी घरी परतले.
त्या वेळेस आई माझ्या कडे आली होती. दुपारी आदित्यला तिने स्टॉप वरून घरी आणले.
आणि तिच्या पाठोपाठ मला "तोच warm" आवाज माझ्या घरी ऐकू आला. मला तो हवा हवासा वाटत होता , बोलावेसे वाटत होते पण मग माझ्या भीष्म प्रतिज्ञेचे काय?!
"तो आवाज" माझ्या आई पाठोपाठ घरात शिरला. मी काहीही प्रतिक्रिया न देता समोर घडणारे पाहत होते. माझ्या आईने ‘त्या आवाजाला’ एका मोठ्या डब्यात ठेपले भरून दिले, २/३ चटया, उश्या आणि पांघरूण दिल्या.
माझी घुसमट होत होती; राग आला होता ;कुणाचा राग तेही कळत नव्हतं ,पण प्रचंड उद्वेग होता.
‘तो आवाज’ अतिशय गोड हास्य देत , आईला आणि मला धन्यवाद करत निघून गेला.
हुश्श "काय ग? कोण ही? आणि का म्हणून तू तिला एवढे सगळे दिलेस? आपण ओळखतो का हिला ? सगळे इथे एकमेकांचा फायदा घेत असतात. मी सांगितले होती ना तुला त्या cheque ची कथा? मग का परत मदत करायला गेलीस? तू काय मुंबईला परत जाशील पण मला सगळे सहन करावे लागणार. तुला काही कळतच नाही."
एका श्वासात एवढे सगळे मी माझ्या आईला सांगून टाकले. आई हसली. मला अजूनच राग आला. ती म्हणाली,"आता माझा ऐक.
हे कुटुंब दिल्लीहून आजच जवळच्या घरात राहायला आले आहे. अजून त्यांचे सामान आले नाही आहे .’ तिने’ मला हे सांगितल्यावर मी आपण हुन तिला आपल्या घरी बोलाविले आणि जेवण आणि उश्या चादरी दिल्या."
"तुझा वाईट अनुभव तू मला अगदी पोटतिडकीने सांगितलंस. पण सगळ्या माणसांना एकाच मोज मापाने मोजणे बरोबर नाही. अनुभव घेण्यासाठी अगोदर माणसांना एक चान्स तर दे. आज तू तिच्या जागी असतीस आणि तुला कोणी मदत केली नसती तर तुला कसे वाटले असते ? दुसर्यांनी कसे वागावे ते आपण कोण ठरवणार ? त्यांनी त्यांचे वागावे आणि आपण आपले .”
मी ऐकत होते आणि माझे मनही मला हेच सांगत होते. मग मात्र मी खूप शांत झाले. तो वाईट अनुभव जणू काही विसरूनच गेले.
दुसऱ्या दिवशी परत "तोच गोड आवाज" मला बस स्टॉप वर भेटला. मात्रह्या वेळीस मी मनापासून हसले. "तो आवाज " परत परत मला धन्यवाद करत होता. मुलांना ठेपले कसे आवडले ते सांगत होता. मला खूप अवघडल्या सारखे वाटत होते आणि मी अगदी प्रामाणिकपणे "त्या आवाजाला" सगळं काही सांगून टाकले .
"तो आवाज" मंजुळ पणे हसला आणि म्हणाला," आप मुझे बहोत अच्छे लगे। One requires a lot of courage to deny the credit. हमारी दोस्ती खूब जमेगी. "
आज ह्या गोष्टीला १५ वर्ष होतील " तो मंजुळ आवाज" गेली १५ वर्ष माझ्या आयुष्याचा आधार स्तंभ बनला आहे.
"त्या आवाजाने मला खूप काही शिकवले. " तो आवाज " चांगल्या वाईट क्षणांत माझ्या बरोबर असतोच.
माझ्या उद्वेग, prejudises आणि अहंकारामुळे मी अतिशय सुंदर मैत्रीण, एक गुरु हरवून बसले असते.
माझ्या गुरूने; माझ्या आईने मला त्यातून मार्ग दाखविला.
it also takes courage to admit I was wrong :) well written
ReplyDeleteThank you very much.
ReplyDelete