Komazawa हे Tokyo मधील एक छोटंसं आणि टुमदार suburb. ह्या उपनगरात English सापडणे जरा कठीणच.
Komazawa चे रहिवासी दोन गोष्टींचा अतिशय अभिमान बाळगतात. पहिली गोष्ट ,university ज्या मुळे येथील train station चे नाव "Komazawa daigaku "ठेवले गेले आहे.
आणि दुसरी , सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे "Komazawa Olympic Park ".
Komazawa मधील प्रत्येक रहिवासी मोठ्या ताठ मानेने "मी Komazawa Park च्या बाजूला राहतो." असे सांगत असतो.
1964 ला Summer Olympic साठी Komazawa Park उभारल गेले. तब्बल 413,537 square metres (4,451,280 sq ft) क्षेत्रफळाचे हे पार्क Komazawa ची शान आहे. त्याच्या घेराला लागून टुमदार , परीकथेतली जपानी घर वसलेली आहेत.
जे काही मागाल ते ह्या park मध्ये मिळेल.... २०,००० क्षमतेचे stadium , swimming pool , tennis courts , लहान मुलांच्या खेळण्या साठी स्वतंत्र जागा , baseball ground , Cherry blossom ची असंख्य पण शिस्तीत उभी झाडे, आणि त्याच्या परिघाला लागून तीन अधोरेखित lanes ; पहिली cycling साठी, दुसरी joggers साठी आणि तिसरी चालणाऱ्यांसाठी ..... त्या मोकळ्या , कुंपण विरहित आणि अफाट पार्कलाही जपानी शिस्त आहे....
ते सर्वांना स्वतःत सामावून घेते.
दिवसाच्या कोणत्याही प्रहरी तिथे भरपूर माणसं असतात..... काही धावणारी, काही चालणारी, काही खेळणारी, काही निवांत बसलेली, काही पुस्तकांत रमलेली, काही निसर्गाचा आनंद लुटणारी, काही स्टेशन , घरांकडे ये जा करणारी .....
जुलै २०१० ला आमचे विंचवाचे बिऱ्हाड Hong Kong हुन Tokyo ला आले. Komazawa आणि त्यातील एक सुंदर घर पहिल्या भेटीतच आम्हाला आवडले , आपलेसे वाटले. आमचे घर Komazawa Park पासून २ मिनिटांच्या अंतरावर होते. माझी सकाळ, आदित्यची संध्याकाळ आणि आमचे शनिवार , रविवार ह्या Park मध्ये रमत असत.
चार वर्ष्यांच्या वास्तव्यात ह्या छोट्याश्या suburb मध्ये मी सोडून एखादाच भारतीय दिसला .
पार्क मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची पूर्ण जबाबदारी माझ्या एकटीवरच होती. नित्य नियमाने दर सकाळी मी Komazawa park मध्ये जॉगिंग साठी जायचे. साधारणतः वेळेप्रमाणे ठराविक चेहेरे ओळखीचे झाले होते. हास्य आणि मानेची सहज हालचाल करत "Ohayo gozaimasu" म्हणत सुप्रभात ह्यांची अगदी सहज देवाण घेवाण होत असे.
अशीच एक November २०१३ मधील सकाळ.... बोचरी थंडी, पानं गळून उदास वाटणारी झाडं , काळ्या ढगांनी अजूनच काळोखी वाटणारं आभाळ.... हात चोळत, उब घेत मी धावायला सुरु केले. डोळ्यांच्या कडेने ओळखीचे चेहेरे पाहत अंतर कापत होते.
संथ गार बोचरा वारा , ती ओकी बोकी झाडं आणि काळोखा मुळे मुंबईची, घराची खूप आठवण येत होती. Park मध्ये येण्याआधी सचिन तेंडुलकर ची शेवटची Match , त्याचे क्रिकेट जगातला , त्याच्या fans ला उद्देशून म्हटलेले मनस्वी निरोपाचे भाषण बघितले होते. मन रमत नव्हतं. मुंबईतल्या Wankhede stadium मधील "सचिन...सचिन..." चा उदघोष मला Komazawa Park मध्ये ऐकू येत होता. जगभरच्या सचिन प्रेमीं सोबत मी ही हळवी झाले होते.
मी माझा नित्यक्रम आटोपता घेतला. आणि एका Bench वर शांत बसले. जवळच एका जाळीदार बंद छोट्याश्या मैदानात Gateball चा खेळ चालू होता. तो खेळ आणि त्यातील खेळाडू आता मला तोंडपाठ झाले होते. आमची तुरळक शब्दं आणि दररोजची हास्याची ओळख होती.
Komazawa मधील आजी आजोबा एकत्र येऊन अतिशय नीट नेटके पणे , नियमांनुसार हा खेळ खेळायचे. त्या आधी एक आजोबा मैदान स्वच्छ करायचे. एक आजी Gateball साठी लागणाऱ्या १० balls पैकी लाल रंगाचे odd नंबरचे balls आणि पांढऱ्या रंगाचे even नंबरचे balls रीतसर पणे वेगेवेगळे करायची. अजून एक आजोबा तीन gates आणि एक goal post रचून ठेवायचे. तोवर बाकी आजी आजोबा हातोड्यासारख्या दिसणाऱ्या bats घेऊन त्यांना join व्हायचे.
माझे jogging संपण्याची वेळ आणि जागा ही आजी आजोबांच्या Gateball संपण्याच्या वेळेशी संलग्न होती.
त्या दिवशी मी शून्यात हरविली असताना एक आजोबा माझ्या शेजारी येऊन बसले,"Summimasen ! Ogenki desu ka ?"
त्या प्रेमळ विचारपूस सरशी मला खूप भरून आले. मी कसे बसे त्यांच्याशी हसले.
"Anata wa Indo jin desu ka ?" हळूच असे म्हणत आजोबांनी मी Indian असल्याची पुष्टी करून घेतली .
मी जरा गोंधळून होकारार्थी मान डोलावली. ते मोडक्या तोडक्या english ,मधेच Japanese शब्द वापरून बोलू लागले.
"I love Sachin Tendulkar from your country." त्यांचे वाक्य पूर्ण होत असतानाच मी माझे सगळे आश्चर्य एकत्रित करून विचारले," Ojiisan, Do you know anything about cricket? Do you play or follow the game?"
"Chotto !" आपले ओठ चुंबू करत मिचके डोळे अजूनच बारीक करत बोटांची चिमूट करत आजोबा म्हणाले.
Chotto याचा अर्थ 'नाही' नसला तरी "नाही" असा घ्यायचा असतो हे आताशी मला तोंडपाठ झाले होते.
माझी उत्सुकता अजूनच वाढली आणि मी त्यांचे शब्द काळजीपूर्वक ऐकू लागले.
भाषांविषयीचे होते नव्हते ते ज्ञान वापरून आजोबा म्हणले ," I respect Sachin Tendulkar as a human being.
I don't know much about the game of cricket other than its spelling. But I am a sport enthusiast and do read a lot about games in general. And that is how I knew about cricket and the aura and glory of Sachin Tendulkar across the world. He is a great athlete and I have read about him extensively."
सचिनची स्तुती आपल्या सगळ्यांना पाठ आहे पण बोलायला बुजणाऱ्या जपानी माणसाच्या तोंडातून ऐकणे हे कोण आश्चर्य होतं!
ज्या देशात "bat आणि ball " हे फक्त baseball मध्ये वापरले जातात असा ठाम विश्वास आहे त्या देशातील एक माणूस सचिन कसा त्याच्या bats आणि pads ला मान देतो हे ऐकणे म्हणजे आठवे आश्चर्य !
आजोबा बोलत होते आणि मी थक्क होऊन ऐकत होते," I read that Sachin Tendulkar maintains all the equipments he uses personally and immaculately. He worships his bats and even carries the pics of Gods in his kit bag. I even read one of his fellow mate saying Sachin preached him not to throw the bat or hammer the bat when you get out. Sachin always touches the ground before batting and even thank God every time he scores big runs. Am I correct?"
मी निशब्द झाले. जग भर सचिन ची ओळख त्याने रचलेल्या धावांच्या डोंगराने होते. त्याने मोडलेल्या दिग्गजांच्या records ने होते. सचिन ने साध्य केलेल्या world records ने होते. आजोबांनी दाखवलेली ओळख माहितीतली असली तरी सहज जाणवणारी नव्हती.
जपान मध्ये Baseball ह्या American खेळावर जीवापाड प्रेम करतात आणि लहानपणापासून खेळतातही. लहानग्या जपानी मुलांकडे Cricket bat ऐवजी प्लास्टिक ची Baseball bat असते. Japan मध्ये क्रिकेट हे नाहींच्या बरोबर आहे. आणि त्यात चक्क थेट "सचिन तेंडुलकर " हे नाव आणि ते सुद्धा Japanese माणसाच्या तोंडून ?!
आजोबांचे शब्द त्या गारव्यात विरघळून जात होते . माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. मी कुठे आहे.... India कि Japan ?
"I know Sachin Tendulkar retired today. You should be very proud of him. You are so fortunate to come from Sachin's country." आजोबांच्या हाकेने मला जाग आली .
आजोबांनी त्या क्षणी आयुष्य किती सहज, सोप्प्या पद्धतीने मांडले. आयुष्य , आपल्या आजू बाजूच्या प्रत्येक गोष्टी गृहीत न धरता त्या समोर नतमस्तक व्हा ..... त्याला समर्पित व्हा .... कृतज्ञता बाळगा अगदी सहज पणे सांगून गेले.
मुंबई पासून ६,७२७ km , समुद्रांपलीकडल्या Tokyo मध्ये सचिन सारखीच Value system जोपासणारे आणि त्याचा अभिमान बाळगणारे जपानी आजोबा मला भेटले.
काही कळण्या अगोदर ते आजोबा माझ्या डोक्यावर मायेचा हात थोपटत बाकीच्या आजीआजोबांच्या घोळक्यात मिसळून गेले. मी तिथेच थबकले. त्याची पाठमोरी आकृती डोळ्याआड होत होती.
आता मात्र माझ्या चेहेऱ्यावर अभिमान होता, ओठांवर अस्फुट हसू होते आणि नकळत पुटपुटत होते .....
"Domo Arigato gozaimasu , Ojiisan !
I AM SO PROUD TO BE FROM TENDULKAR 'S COUNTRY."