My Blog List

Sunday, 14 June 2020

Anyu.....एका श्वासाचे सुंदर नाते

                 The best thing is listening to someone's heartbeat, and knowing that it's beating like that because of you Picture Quote #1                                                                 


१२ जून ,२०२०; माझ्या शेजारी राहणारा Hungarian 'Naughty Monkey ' वर्ष्यांचा झाला.  सोनेरी केस,गोरा पान आणि निळे हिरवे डोळे.  आत्ताशी कुठे तो बोलायला लागला आहे.  मी दिसताच आपले गोरेपान इवलेसे बोट तोंडात घालत " swatiiii .... anyuuuuu " अशी हाक मारत धावत येऊन तो मिठी मारतो. 

 तर आजची गोष्ट आहे माझ्या वर्ष्यांच्या अतिशय गोड Hungarian मित्राची किंबहुना माझ्या आणि त्याच्या अजब गजब मैत्रीची!


 १० सप्टेंबर, २०१८ एक नेहेमी सारखा सरळ सोट दिवस.  आदित्यला Boston ला सोडून येऊन / दिवस झाले होते. 

आमचे त्रिकोणी कुटुंब जरा ताणले गेले होते . महेश आणि मी लंडन ला आणि आदित्य समुद्रा पलीकडे Boston ला. 

मनातून आदित्यची आठवण आणि काळजी काही जात नव्हती. 

दुपारचे साधारण :३० वाजले असावेत.  अचानक माझ्या घराची बेल वाजू लागली.  कोणीतरी ती दाबूनच धरली होती.  इथे सहसा आधी कळवता घरी येत नाहीतरीतसर दोन तीन दिवस अगोदर कळवून, विचारूनच येतात. 

 

मी धावतच दाराकडे पोचले.   keyhole मधून पाहण्याचा उद्योग करता थेट दार उघडले.  समोर बुटकी, गोरी पान, सोनेरी केसांची माझी Hungarian शेजारीण.  तिच्या घाऱ्या डोळ्यां मधील पाणी गालांवरून खाली वाहत होते. 

तिचे सर्वांग थरथरत होते आणि तिच्या हातात १८ महिन्यांचा छोटासा 'माझा मित्र' .... त्याचे गोरे पान शरीर पांढरे फटक पडले होते.  त्याचे ओठ निळे काळे पडले होते.  मान आईच्या होतात खाली लोम्बकळत होती. 

"Please call the ambulance.  I don't know what happened to him. Call the ambulance . My son is not breathing. " ती श्वास घेता विनवत होती.  मी जिथल्या तिथे  थिजून गेले.  डोकं काम करायचे बंद झाले होते.  काय करू ते सुचत नव्हते.  ती जोरात परत ओरडली ,"Call the ambulance.  He is turning cold. "

 

मी भानावर आले आणि लगेचच NHS चा ९९९ emergency नंबर dial केला.  फोनवर बोलत असताना माझे सगळे लक्ष्य तिच्या वर आणि निपचित पडलेल्या पिटुकल्या मित्रावर होते . 'तो' निपचित होता आणि त्याची आई थरथर कापत देवाचा धावा करीत होती.  तिला उभे राहणेही अशक्य झाले होते. 

 

मी तिला एका हाताने घट्ट धरून ठेवले आणि फोन वर  NHS staff ला प्रश्नांची उत्तरे देऊ लागले. 

"Mam , Is the patient breathing ? Does He have fever ? How much Is the fever ? Did you give him any medicine ?" मी कसे बसे ते प्रश्न तिला विचारात होते . मनात देवाचा धावा करत होते. 

मी NHS staff ला situation सांगितल्यावर तिसऱ्या  मिनिटाला दारात ambulance येऊन उभी ठाकली. 

 

एक तरुण मुलगी आणि दोन तरुण ऑलिव्ह ग्रीन युनिफॉर्म मध्ये अतिशय शांत आणि पॉसिटीव्ह चेहेऱ्याने आम्हां दोघींच्या समोर येऊन उभे राहिले.  त्यांनी ताबडतोब त्या चिमुकल्याला ताब्यात घेतले. 

आणि त्याच्यावर उपचार चालू केले. 

मी आतून थरथरत होते आणि त्याच्या रडणाऱ्या आणि थरथरण्याऱ्या आईला घट्ट पकडून उभे होते ,"Dont worry ! He will be absolutely fine. "   मी तिला  परत परत समजावत होते आणि माझ्या मनाला ही पटवून देत होते. 

१८ महिन्यांचं एवढंस पिल्लू श्वासा साठी  झगडत होतं. 

 

ह्या आधी कदाचित /  वेळा आम्ही एकमेकांना parking garage मध्ये भेटलो होतो.  एक हास्य आणि bye एवढीच ओळख. 

पण त्याची जगण्याची धडपड पाहून माझा श्वास रोखला गेला होता.  हात पाय थंड पडले  होते. 

त्या क्षणी माझं आणि त्या पिल्लाचं श्वासाचं नातं जोडले गेले.  त्याची श्वासा साठी एक धडपड मला श्वास देऊन जात होती. 

काही वेळाने ते पिल्लू शुद्धीत आले . त्याची आई त्याला उराशी धरून अजूनच रडू लागली.  मलाही रडू येत होतं पण मी ते दाबून ठेवले.  मनातल्या मनात देवाचे आभार मानले.  त्या क्षणी वाटले की संकट टळले. 

पण medical staff च्या लक्षात आले की त्या पिल्लाचा डावा हात temporary paralysis सारखा behave करत आहे त्याचा ओठ डाव्या बाजूला खेचला गेला आहे त्यांनी ताबडतोब त्याला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेतला त्याच्या आईला काही सुचत नव्हतं त्या चिमुरड्याचा ताप डोक्यात चढल्याचा दोष ती स्वःताला देत रडत होती त्या पिल्लाचे बाबा business trip ला गेले असल्याने ती अजूनच हतबल झाली होती

 

मी तिची आणि पिल्लाची बॅग भरून दिली पैसे आणि काही खाऊ तिच्या बरोबर दिले. 

ते पिल्लू मात्र हसत होते , मधेच रडत होते . त्याला काय चालले आहे त्याची काहीच कल्पना नव्हती. 

मला काहीच कळत नव्हते, मात्र मी स्वतःला शांत दाखवण्याचा आणि ठेवण्याचा प्रयत्न करत होते. 

Ambulance  पिल्लू  आणि त्याच्या आई सोबत syren वाजवत रस्तावरुन धावत सुटली. 

 

माझ्या धैर्याचा बांध मात्र सुटला होता.  मी तिथेच मटकन खाली बसले आणि रडू लागले. 

माझा आणि त्या १८ महिन्यांच्या पिल्लाचा श्वास एक झाला होता.  नकळत एक सुंदर नातं घडत होतं. 


Hospital मध्ये त्याच्या खूप tests केल्या गेल्या आणि आठवड्या भरात ते पिल्लू बरे होऊन घरी परत आले. 

 

/ दिवसांनी परत माझ्या घराची bell वाजली.  माझा हृदयाचा ठोका परत एकदा चुकला.  नको नको ते मनात येऊन गेले . 

धीर करून मी दार उघडले.  समोर हसणारे ते पिल्लू ,आई आणि बाबांसोबत उभे होते. 

त्यांनी मला एक सुंदर मोत्यांचे bracelate दिले.  मी ते नाकारले पण त्यांनी आग्रहाने मला ते परत घ्यायला लावले. 

 

त्यात एक पत्रं होते  :

 

Our Dearest Swati

 

You are God sent.

We as proud Christians believe in God and his magic. We will continue to believe in HIM but from now on we have two Gods …..HE and You.

Our family would have been shattered without Oscar. You saved him. You hold us through this difficult time.

We don’t know how to thank you.

May God bless you and your family .

We are indebted to you till last breath of our life.

Please accept this pearl bracelet as a small token from our entire family and especially from Oscar.

You are his “anyu”.

 

Always yours ,

Entire Bunt family from Hungary

 

I cherish that bracelet and every word in this letter.

But more than that I cherish the warmth and love Oscar conveys to me every time he runs to me and hugs me, every time he smiles and giggles with me, every time he shows his happiness and joy seeing me.

 

And every time Oscar calls me “anyu” I learn an eternal truth “You don’t have to give birth to become a mother; you can share the breaths and be her/his mother…Anyu ;as in Hungarian language.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

19 comments:

  1. तुझ्या सांगण्यातून जाणवतय तेव्हाची घालमेल, जगतोय न हा भेडसावणारा प्रश्न, खूप उत्कटतेने लिहिले आहेस.. खूप खूप छान.

    ReplyDelete
  2. I can understand how your neighbour must have felt. In a foreign country, unknown systems, unknown people, you were a godsend to her. Hats off to your calmness and courage in such situation.
    Swati, you got a great nack of expressing emotions in words, keep it up.

    ReplyDelete
  3. Really loved very part of this “thrilling” and real life story. “माझा आणि त्या पिल्ल्चा श्वास एक झाला होता” ..this sentence is the most beautiful expression I enjoyed ..

    ReplyDelete
  4. You know that each word coming from you means a lot. Thank you very much.

    ReplyDelete
  5. Very intense, hats off to your presence of mind and deft handling of the situation. There is nothing greater in this world than saving a human life and you were a part of it. God bless.

    ReplyDelete
  6. Swati, while reading, the incident, anxiety & emotions at that moment play up in front your eyes, in the way you have narrated the story. Superb. These are the memories for you, Oscar and his parents to keep and definitely relationships for life..

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you very much Anand! i am glad you liked the story. Hope you will enjoy other stories too. happy reading!

      Delete
  7. स्वाती अन्यू
    माझ्यामते प्रत्येक स्री कडे उपजत सद्भाव असतो आणि म्हणून देवाने या जगाच्या उत्पत्ती ची जबाबदारी ही स्त्री कडे दिली आहे. खरतर तू जे काही केलेस ते एक माणूस म्हणून जे अपेक्षित आहे तेच केलस आणि त्यामुळेच त्यासाठी जेव्हा तुला ऑस्कर अवॉर्ड देण्यात आल तेव्हा तू संकोचलीस. तुझ्या साठी ते कर्तव्य होत. पण मजा अशी आहे की सध्याच्या युगात कर्तव्याची माहिती आणि त्याची जाणीव यात बरच अंतर पडत गेलय आणि यामुळेच जेव्हा कुठे अशी जाणीव प्रत्यक्ष अनुभवायला मिळते तेव्हा समोरच्या व्यक्ती भारावून जातात आणि भौतिक स्वरूपात आपली कृतज्ञता व्यक्त करतात. असो. तुझ्या अनुभवाच्या बोलाची पहिलीच शिदोरी आत्मीयता आणि जिव्हाळ्याने भरलेली अशी त्यामुळे खूपच रुचकर. May god bless the goddess within you....

    केदार मृणाल सोहोनी
    ०५/०७/२०२०

    ReplyDelete
  8. अप्रतिम लेखन.इतकी वर्षे वेगवेगळ्या देशात राहून सुद्धा मराठीवरची पकड अजिबात सुटलेली नाहीं यांचे फार कौतुक वाटते.निरनिराळे अनुभव फार हृद्य वाटले.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

    ReplyDelete
    Replies
    1. I am happy that you liked it. Thank you very much for your warm blessings, Kaku! I hope you will like the other stories too.

      Delete

Index

तू भास , तूचि आभास